किरकटवाडी फाट्यावर डंपरखाली चिरडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नांदेड सिटी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
किरकटवाडी फाट्यावर डंपरखाली चिरडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नांदेड सिटी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे डंपरखाली चिरडून एका 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रथमेश लोखंडे (वय 19, रा. गोकुळनगर, नऱ्हे पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकटवाडी फाटा येथे डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने प्रथमेश लोखंडे याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.