
लक्षवेधी लागली…… महिला कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी केल्या….. अडवणूक होत असलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज केले परंतु कारवाई नाही; कोंढवे धावडे महसूल मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही की केली जात नाही?
लक्षवेधी लागली…… महिला कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी केल्या….. अडवणूक होत असलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज केले परंतु कारवाई नाही; कोंढवे धावडे महसूल मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही की केली जात नाही?
पुणे: हवेली तालुक्यातील कोंढवे धावडे महसूली मंडळ अधिकाऱ्यांना नेमके कोणाचे ‘वरदान’ लाभलेय अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. सहकारी महिला कर्मचारी, शेतकरी एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी लावली तरीही अद्याप कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने त्रस्त शेतकरी, नागरिक हतबल झाले आहेत. मंडळ अधिकाऱ्यांना नेमकं वाचवतंय कोण? असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जात आहे.
नोंदींसाठी जाणीवपूर्वक अडवणूक करणे, नोंदीसाठी पैशांची मागणी करणे,पैसे न दिल्यास नोंद रद्द करणे, सहकारी महिला कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत गंभीर तक्रारी व मानसिक छळाचे आरोप, नागरिकांच्या तक्रारींमुळे लोकप्रतिनिधींकडून थेट विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित तरिही मंडळ अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
कोंढवे धावडे महसूल मंडळ कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही अशी परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांच्याबाबत अनेक तक्रारी पडून आहेत मात्र दखल घेण्यात आलेली नाही. कोंढवे धावडे महसूल मंडळात येणाऱ्या गावांतील नागरिक, मिळकती धारक यामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत.











