♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कुकर्माचे फळ…… विषारी गावठी दारू प्रकरणात एकाची कंट्रोल रुमला उचल’बांगडी’, शेकडो किलो गांजासह एक छत्तीसगड पोलीसांच्या अटकेत तर एक कोटींच्या दरोड्यात तो तोतया पत्रकार पुणे पोलीसांकडून गजाआड!

कुकर्माचे फळ…… विषारी गावठी दारू प्रकरणात एकाची कंट्रोल रुमला उचल’बांगडी’, शेकडो किलो गांजासह एक छत्तीसगड पोलीसांच्या अटकेत तर एक कोटींच्या दरोड्यात तो तोतया पत्रकार पुणे पोलीसांकडून गजाआड!

पुणे: ‘म्हणतात ना कर्माचा हिशोब कधी चुकत नाही आणि नियती कोणाला सोडत नाही.’ याचा प्रत्यय सध्या येताना दिसत आहे. हवेली पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, खडकवासला येथील कुख्यात गांजा व्यापारी रामदास सोनवणे व तथाकथित भामटा पत्रकार आशिष तिवारी हे आपल्या कटकारस्थान आणि कुकर्मामुळे सध्या या म्हणीचा अनुभव घेत आहेत. तिघांनी खोटं कारस्थान करुन मला अडकविण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे.

विषारी गावठी दारूने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात अनेकांचा मृत्यू झाला होता. या गावठी दारूच्या भट्ट्या उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले होते. उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या आशिर्वादाने या भट्ट्या सुरू होत्या. त्यांच्या दप्तरीचा या भट्टीचालकांशी थेट संपर्क असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन वांगडे याची तडकाफडकी पुणे ग्रामीण कंट्रोल रुमला उचल’बांगडी’करण्यात आली. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आणि गांजा व्यापारी रामदास सोनवणे यांचे घनिष्ठ संबंध होते.

गांजा व्यापारी रामदास सोनवणे ताला तब्बल 950 किलो गांजासह छत्तीसगड पोलीसांनी अटक केलेली आहे. सध्या तो छत्तीसगडमध्ये जेलची हवा खात आहे. वारंवार तक्रारी करुनही पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलीस त्याच्या गांजाच्या धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. अखेर छत्तीसगड पोलीसांनी त्याला अटक केली.

गांजा व्यापारी रामदास सोनवणे याच्या संपर्कात असलेला व त्याच्यासाठी रोजंदारीवर काम करणारा भामटा पत्रकार आशिष तिवारी याचाही बाजार पुणे शहर पोलीसांनी उठवला आहे. आशिष तिवारी याने पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, गांजा व्यापारी रामदास सोनवणे यांना वाचविण्यासाठी खोटा जबाब दिला होता. पत्रकारितेचा बुरखा पांघरून सुरू असलेल्या त्याच्या काळ्या कृत्यांचा अखेर भांडाफोड झाला आहे. भर दिवसा व्यवसायिकाच्या एक कोटी रकमेवर दरोडा टाकण्याच्या कटात आशिष तिवारी याचा सहभाग उघड झाल्याने पुणे शहर नऱ्हे पोलीसांनी त्याला गजाआड केले आहे.

दुसऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवून संपविण्यासाठी निघालेल्या या तिघांचा नियतीने पद्धतशीरपणे बाजार उठवला आहे. हवेलीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी, पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पंकज देशमुख यांनी वस्तुस्थिती समजून घेण्याचे कष्ट घेतले नाही परंतु नियतीने मात्र या तिघांना माफ केले नाही!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles