♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

MPDA Action: नांदेड सिटी पोलिसांकडून एमपीडीएचा बडगा; सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध; चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

MPDA Action: नांदेड सिटी पोलिसांकडून एमपीडीएचा बडगा; सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध; चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

पुणे:कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करुन वचक निर्माण करण्यासाठी नांदेड सिटी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारावर एमपीडीएचा बडगा उगारण्यात आला आहे. कुणाल शिवाजी पुरी (वय 20 रा विश्व कॉर्नर, धायरी) या सराईत गुन्हेगाराला पुढील वर्षभरासाठी चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. एमपीडीए अंतर्गत नांदेड सिटी पोलीसांची ही बारावी कारवाई असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.
सराईत गुन्हेगारावर 2024 पासून बेकायदा अग्निशस्त्र जवळ बाळगणे, मारामारी, बेकायदा जमाव जमवून दहशत निर्माण करणे, चोरी असे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्याच्या गुन्हेगारी वृत्तीत बदल होत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, झोन तीनचे पोलीस उपायुक्त सागर कवडे यांच्या सुचनेनुसार नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हिलान्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड ,अंमलदार अनिल बारड, प्रथमेश गुरव व कैलास केंद्रे यांनी सदर प्रस्ताव तयार केला होता.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles