♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Crime News:किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर नांदेड सिटी पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई; चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Crime News:किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर नांदेड सिटी पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई; चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

किरकटवाडी: खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ, धमकी देणे, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे, दहशत पसरवणे, बेकायदा जमाव जमवणे असे चार गंभीर गुन्हे दाखल असलेल्या किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर नांदेड सिटी पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज महेंद्र नांगरे (वय 21, रा. किरकटवाडी) असे संबंधित गुन्हेगाराचे नाव असून त्याला चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाया करुन सुधारणा होत नसल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत गुन्हेगार सुरज नांगरे याच्यावर ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सर्व्हिलान्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारड यांनी सदर स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून सुरज नांगरे याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान मागील तीन महिन्यांपासून सुरज नांगरे फरार होता. त्याला पोलीस अंमलदार संग्राम शिणगारे, स्वप्नील मगर, निलेश खांबे व प्रतिक मोरे यांनी भोर येथून ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles