♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

AI जनरेटेड फोटोंचा सुळसुळाट; सोशल मीडियावर बिबट्या व्हायरल! वेगवेगळ्या ॲंगलमध्ये ऐटीत बसलेला बिबट्या आणि ‘डिजिटल अफवा’

AI जनरेटेड फोटोंचा सुळसुळाट; सोशल मीडियावर बिबट्या व्हायरल! वेगवेगळ्या ॲंगलमध्ये ऐटीत बसलेला बिबट्या आणि ‘डिजिटल अफवा’

 

पुणे: सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्स ॲपवर सध्या एकच विषय चर्चेत असून तो म्हणजे आज या गल्लीत बिबट्या दिसला! सकाळी खालच्या आळीत तर संध्याकाळी वरच्या आळीत! कधी पार्कींगमध्ये तर कधी रस्त्याच्या कडेला ऐटीत उभा असलेला फोटो! सोबत स्थानिक ठिकाणाचे नाव आणि काळजी घेण्याचे आवाहन!

धक्कादायक म्हणजे हे सर्व फोटो AI Generated असून स्थानिक फोटोत एडीट करुन रिकामटेकड्यांनी केलेले उद्योग आहेत. या फोटोंमुळे सध्या सर्वत्र नाहक भितीचे वातावरण निर्माण होत आहे. दररोज वेगवेगळ्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या ‘डिजिटल अफवा’ वाऱ्यासारख्या पसरत आहेत.

दरम्यान अशा अफवा पसरविणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. तसेच या अफवांमुळे खरंच जेव्हा बिबट्या दिसेल तेव्हा लोक विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles