♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Crime Update:दान टाकण्याणी बतावणी करून हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरणारा भामटा सिंहगड रोड पोलीसांच्या जाळ्यात; चोवीस तासांच्या आत अंगठी परत मिळवून दिल्याने पोलीस तपासाबाबत समाधान

Crime Update:दान टाकण्याणी बतावणी करून हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरणारा भामटा सिंहगड रोड पोलीसांच्या जाळ्यात; चोवीस तासांच्या आत अंगठी परत मिळवून दिल्याने पोलीस तपासाबाबत समाधान

 

पुणे: सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील ब्रम्हा हॉटेल च्या समोर दान टाकण्याची बतावणी करून हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाची दीड तोळ्याची अंगठी चोरणाऱ्या भामट्याला सिंहगड रोड पोलीसांनी वेगवान तपास करत चोवीस तासांच्या आत जेरबंद करुन मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे दोन लाख रुपयांची अंगठी पोलीसांच्या तपासामुळे परत मिळाल्याने संबंधित ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबियांनी सिंहगड रोड पोलीसांचे आभार मानले आहेत. इरफान बबलू अली (वय 24 रा. गल्ली नं 23, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

25 ऑक्टोबर रोजी माणिकबाग परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक रस्त्याने जात असताना इरफान अली या भामट्याने पिशवीत दान टाकण्याची बतावणी करत हातचलाखीने त्यांच्या बोटातील दीड तोळ्याची अंगठी लंपास केली. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक उल्हास गदम यांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती पडताळून आरोपीची ओळख पटविण्यात आली. दि. 26 ऑक्टोबर रोजी तपासणी पथकातील अंमलदार संदीप कांबळे व समीर माळवदकर यांना आरोपी सय्यनगर परिसरात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्याला जेरबंद करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, अमोल मालुसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार उत्तम तारु,आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, सागर शेडगे, विनायक मोहिते, गणेश झगडे, सतीश मोरे, समीर माळवदकर, संदीप कांबळे,तानाजी सागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चेही माणले आभार!

घटना घडल्यानंतर द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत तातडीने बातमी प्रसिद्ध करुन पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने तपास करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी ‘शंभर टक्के आरोपी पकडणारच!’ असा विश्वास व्यक्त केला होता. अखेर चोवीस तासांच्या आत आरोपीला जेरबंद करुन पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला. त्यामुळे पोलीस प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चेही संबंधित कुटुंबाने आभार मानले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles