♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ट्रिपल सीट, मद्यधुंद अन् फॅन्स नंबर प्लेट…. समोरुन वळन घेत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक; काका-पुतणी गंभीर जखमी; किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेजवळील घटना 

ट्रिपल सीट, मद्यधुंद अन् फॅन्स नंबर प्लेट…. समोरुन वळन घेत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक; काका-पुतणी गंभीर जखमी; किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेजवळील घटना 

 

किरकटवाडी: मुख्य सिंहगड रस्त्यावर किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेजवळ मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन ट्रीपलसीट आलेल्या तरुणांनी जयप्रकाश नारायण नगर कडे वळण घेत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात रहिवासी शेखर बिल्ले व त्यांची पाच वर्षांची नात श्रेया बिल्ले हे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात शेखर बिल्ले यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेखर बिल्ले हे आपल्या पुतणीला घेऊन नांदेड फाट्याकडून घरी येत होते. वळण घेऊन घराकडे खाली उतरत असताना अचानक खडकवासला बाजूकडून वेगात आलेल्या दुचाकीने(MH14 KX 9308) त्यांना धडक दिली. जोरदार धडक बसल्याने शेखर बिल्ले व श्रेयाला गंभीर दुखापत झाली व दुचाकीचेही नुकसान झाले.

धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावत आले. नागरिकांनी जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी R15 या दुचाकीवरील तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यातील एकाचे नाव दानिश नासिर खाण असल्याचे समोर आले आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी बिल्ले कुटुंबिय रात्री नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते परंतु त्यांना परत पाठवून देण्यात आले. आज पुन्हा ते नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles