
Murder :कोंढवे धावडे येथे हॉटेल चालकाचा खून; दारु पिऊन का कामावर येतो म्हटल्याने वेटरने केले चाकूने वार; हॉटेल चालकाचा जागीच मृत्यू
Murder :कोंढवे धावडे येथे हॉटेल चालकाचा खून; दारु पिऊन का कामावर येतो म्हटल्याने वेटरने केले चाकूने वार; हॉटेल चालकाचा जागीच मृत्यू
कोंढवेधावडे: येथील पिकॉक हॉटेल च्या चालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दारु पिऊन का कामावर येतो असे म्हटल्याने वेटरने चाकूने वार करुन हॉटेल चालकाचा खून केला. संतोष शेट्टी वय 46 असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. उत्तमनगर पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आरोपी पंधरा दिवसांपूर्वीच हॉटेल मध्ये वेटर म्हणून कामाला आला होता. तो दारु पिऊन कामाला येत असल्याने हॉटेल चालक संतोष शेट्टी हे त्याला दारु पिऊन कामाला येत जाऊ नको असे वारंवार सांगत होते. आजही तो दारू पिऊन कामावर आल्याने संतोष शेट्टी त्याच्यावर रागावले. त्यावेळी वेटर किचनमध्ये गेला व चाकू घेऊन आला. काही कळण्याच्या आत त्याने संतोष शेट्टी यांच्या मानेवर पाठीवर चाकूने सपासप वार केले. संतोष शेट्टी गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.
घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.गंभीर जखमी असलेल्या संतोष शेट्टी यांना उपचारांसाठी नेण्यात आले परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तमनगर पोलीसांनी आरोपी वेटरला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.








