♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

illigal teak wood cutting: बेकायदा सागवान तोड प्रकरणी दंडात्मक कारवाई आणि शंभर झाडांची लागवड करण्याचे भांबूर्डा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे आदेश; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीचा परिणाम

पुणे: खानापूर येथील बेकायदा सागवान तोड प्रकरणी अखेर वन विभागाने कारवाई केली असून अठराशे रुपये दंड व पर्यावरणाची हानी भरुन काढण्यासाठी येत्या पावसाळ्यात शंभर झाडांची लागवड करुन त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचे आदेश भांबूर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिले आहेत. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने हा विषय लावून धरल्यानंतर खानापूर वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांच्या अहवालानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दडपण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते.

खानापूर येथील गट नं 224 मध्ये मोठ्या प्रमाणात सागवानाच्या झाडांची तोड करण्यात आली होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तोडून पडलेली सागवानी लाकडे आढळून आली. वृक्षतोडीचा परवणा घेतलेला नसल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुरुवातीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

काही वेळानंतर अधिकाऱ्यांचा सूर बदलला आणि ‘कारवाई करु नका हा माल आपल्या जवळच्या माणसाला लागत होता’ असे काहीजण म्हणत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई करताना जवळचा-लांबचा असा कोणताही भेदभाव न करता तटस्थपणे कारवाई करण्यात यावी अशी भूमिका ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने घेतल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर सर्व लाकडे जप्त करुन आणली. त्यानंतर दि. 13 मार्च रोजी खानापूर वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल भांबूर्डा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार अठराशे रुपये दंड दहा दिवसांच्या आत भरण्याचे व येत्या पावसाळ्यात शंभर झाडांची लागवड करुन त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचे आदेश वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिले आहेत.

(वन विभागाने जप्त केलेली सागवानाची लाकडे)

सागवान वखारींची तपासणी गरजेची

सिंहगड-पानशेत परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची झाडे आहेत. रात्रीच्या वेळी सागवान तोडून त्याची विक्री केली जाते. अनेक वेळा वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असे प्रकार येतात मात्र ‘तडजोड करणारी टोळी’ तयार असते आणि तडजोड अधिकाऱ्यांसाठीही ‘हितकारक’ असते. अनेक वेळा तर सागवानाची तोड सुरू आहे अशी माहिती देणारेच पुन्हा तडजोडीसाठी ‘पुढाकार’ घेत असल्याची माहिती ऐकायला मिळत आहे. परिणामी सागवानाच्या वखारी जोमात सुरू आहेत. या वखारींमध्ये असलेल्या लाकडांची नियमित तपासणी वन विभागाचे अधिकारी का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles