♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Robbery:खडकवासला परिसरात पुन्हा चोरांचा धुमाकूळ; बंद सदनिका फोडून लाखोंचा ऐवज लंपास तर मोटार रिवाइंडींग चे दुकान फोडून तब्बल तीस मोटारी आणि तांब्याच्या तारांची चोरी; हवेली पोलीसांची रात्र गस्त म्हणजे ‘बैल गेला नि झोपा केला!’

खडकवासला: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला गावात मागील काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून कोल्हेवाडी व मुकाईनगर येथील बंद सदनिका फोडून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच मुकाईनगर येथील मोटार रिवाइंडींग चे दुकान फोडून तब्बल तीस मोटारी व तांब्याच्या तारा असा मोठा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला आहे. सातत्याने घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे रहिवासी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हेवाडी येथील सुशिला पार्क सोसायटीतील फेज एक मध्ये राहणारे कमल अर्जुनराम परिहार हे परिवारासह मुळ गावी गेले असता त्यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 2,44,400/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संजय पालांडे अधिक तपास करत आहेत. मुकाईनगर येथेही घरफोडी करण्यात आली आहे मात्र मात्र संबंधित महिला पुन्हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली नाही.

मुकाईनगर येथेच मोटार रिवाइंडींग चे काम करणाऱ्या योगेश उत्तरेश्वर पवार या तरुण व्यावसायिकाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीस मोटारी व तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहेत. रात्रीच्या वेळी पत्रा वाकवून ही चोरी करण्यात आली आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर मोटारी व इतर मुद्देमाल चोरीला गेल्याचे पवार यांच्या लक्षात आले. याबाबत पोलीस नाईक गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.

 

रात्र गस्त प्रभावी कधी होणार?

मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोड्या होत असताना हवेली पोलीस ठाण्याची रात्र गस्त नेमकी कशी होते? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. रात्र गस्तीचे वाहन ठराविक वेळी व ठराविक ठिकाणीच फिरते, त्यामुळे चोरांनाही रान मोकळं मिळत आहे. तसेच रात्र गस्तीसाठी तैनात असलेले काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीतील काही ‘ठरलेल्या ठिकाणी’ वाहन उभे करून झोप घेत असल्याचेही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्र गस्त प्रभावी करण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीचा प्रत्यय येत राहिल.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles