♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 46 प्रवाशांचे प्राण; आपत्कालीन परिस्थितीत मदत करायची सोडून एका अज्ञाताकडून बसचालकालाच मारहाण 

पुणे: सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीएमपीच्या बसला खडकवासला धरणाजवळील डीआयएटी परिसरात अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे; मात्र बसचालक विकी मेढेकर आणि वाहक निलेश ताठकर यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 46 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. दुर्दैवाने अशा आपत्कालीन परिस्थितीत एका मद्यधुंद अज्ञाताने मदत करायची सोडून चालक विकी मेढेकर यांना मारहाण केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खानापूर येथून सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बस स्वारगेट च्या दिशेने निघाली होती. रविवार असल्याने सिंहगड रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ होती. डीआयएटी गेट जवळील चौपाटी परिसरात बस आल्यानंतर अचानक आवाज झाला व चालक विकी मेढेकर यांना मोठ्या प्रमाणात जाळ व धूर दिसला. चालक मेढेकर यांनी मोठ्याने वाहक निलेश ताठकर यांना आवाज दिला व बस कडेला घेण्याचा प्रयत्न केला. चालक मेढेकर व वाहक ताठकर यांनी तातडीने प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. बसमध्ये तब्बल 46 प्रवासी बसलेले होते. सर्वजण सुखरूप बचावले. अचानक ही दुर्घटना घडल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच एका मद्यधुंद अज्ञाताने चालक मेढेकर यांना मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक शितल ठेंबे, पोलीस हवालदार दिनेश कोळेकर, पोलीस हवालदार रुपनवर, पोलीस हवालदार निलेश राणे, पोलीस नाईक गणेश धनवे, पोलीस कॉन्स्टेबल व्यंकट काळे, चोरमले तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पी एम आर डी ए च्या अग्निशमन दलाचे वाहनही दाखल झाले होते परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत करुन घेतली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles