♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sinhagad Ghat: सिंहगड घाट रस्त्यावरिल धोकादायक दरडीच्या कामाला अखेर सुरुवात परंतु ‘उपद्रव शुल्काच्या हव्यासापोटी’ वन विभागाकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ; कामासही लागतोय विलंब

सिंहगड: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सिंहगड घाट रस्त्यावरिल धोकादायक दरड काढून प्रतिबंधात्मक काम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे मात्र अगोदर वेगवेगळे कारणं पुढं करुन कामात खोडा घालणारा वन विभाग अजूनही आडमुठ्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. दरड काढण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे दगड कोसळत असताना वन विभागाने घाट रस्ता सुरु ठेवल्याने अत्यंत धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असल्याने पर्यटक व नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच ‘उपद्रव शुल्काच्या हव्यासापोटी’ वन विभागाकडून हा जीवघेणा खेळ सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील सुमारे दोन वर्षांपासून सिंहगड घाट रस्त्यावरिल अठ्ठावीस नंबर वळणावरील अती धोकादायक दरड काढण्यासाठी जिल्हाधिकारी, वन विभाग यांचे सातत्याने लक्ष वेधण्यात आले होते. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे वन विभागाने सुमारे दीड कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता मात्र तांत्रिक अडचणी पुढे करत काम करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. खोदकाम न करता काम करावे यावर वन विभाग अडून बसला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ञांचा सल्ला घेतला व खोदकाम करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. अखेर वन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करण्यास परवानगी दिली.

काही दिवसांपूर्वी या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात दोन -तीन दिवस घाटरस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता परंतु आता पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पोकलेन मशिनने दरड प्रतिबंधक काम सुरू असल्याने मोठमोठे दगड खाली कोसळत आहेत. असे असताना वन विभागाने घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, भांबुर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखने आवश्यक आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनीही संबंधितांना तातडीने योग्य ते आदेश देणे गरजेचे आहे. वाहतूक सुरू असल्याने संबंधितांना काम करताना अडथळा निर्माण होत आहे. तासंतास मशिन उभ्या ठेवून हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी खोदकाम पूर्ण न झाल्यास हे ठिकाण वाहतुकीसाठी अधिक धोकादायक बनणार असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वन विभागाने काही दिवस घाटरस्ता वाहतूकीसाठी पूर्ण बंद ठेवून तातडीने काम करुन घेण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

” आम्ही सातत्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहतूक बंद ठेवण्याबाबत कळवत आहोत परंतु रस्ता बंद करता येणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वाहतूक सुरू असल्याने कामात तर अडथळा येतच आहे शिवाय अपघात होण्याची शक्यता आहे. वन विभागाकडे याबाबत लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.” नामदेव राठोड, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles