♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिंदेवाडी ग्रामपंचायतीचा कारभार पुणे जिल्ह्यात अव्वल!नवनाथ झोळ यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर

शिंदेवाडी ग्रामपंचायतीचा कारभार पुणे जिल्ह्यात अव्वल!नवनाथ झोळ यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर

(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे:महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार’ यंदा भोर तालुक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नवनाथ झोळ यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने हा सन्मान जाहीर केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याची निवड करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते आयोजित यशवंत पंचायत अभियान पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

नवनाथ झोळ हे सुरुवातीपासूनच तंत्रस्नेही ग्रामविकास अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिंदेवाडी (ता. भोर) ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना त्यांनी प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख केला.

त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदेवाडी ग्रामपंचायतीने विकासकामांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली असून ग्रामपंचायतीचा कारभार पुणे जिल्ह्यात आदर्श मानला जात आहे. ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून नागरिकाभिमुख प्रशासनाची नवी ओळख निर्माण केली आहे.

नवनाथ झोळ यांच्या कार्याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी घेतली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी शिंदेवाडी ग्रामपंचायतीला भेट देऊन कारभाराचे कौतुक केले असून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

या पुरस्कारामुळे शिंदेवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भोर तालुक्याचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून नवनाथ झोळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही शासनाकडून मिळालेली योग्य पावती असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles