♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला येथील यशवंत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी बसविले ग्रील; विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा

खडकवासला येथील यशवंत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी बसविले ग्रील; विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा

पुणे : खडकवासला येथील यशवंत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अत्यंत धोकादायक ठिकाणी अखेर संरक्षणात्मक ग्रील बसविण्यात आले असून त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या समस्येकडे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने सातत्याने लक्ष वेधल्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने दखल घेत आवश्यक उपाययोजना केली.

यशवंत विद्यालयाकडे जाणारा हा रस्ता दरीसदृश उताराच्या कडेला असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता कायम होती. शाळेत ये-जा करणारे शेकडो विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात. रस्त्यालगत कोणतेही संरक्षणात्मक कठडे अथवा ग्रील नसल्याने वाहन घसरल्यास किंवा पादचारीचा तोल गेल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.

या धोकादायक परिस्थितीबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेविका अनिता इंगळे आणि नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी या विषयाचा पाठपुरावा करत पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित ठिकाणी मजबूत सुरक्षा ग्रील बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

ग्रील उभारल्यानंतर आता रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे आभार मानत अशाच प्रकारे परिसरातील इतर धोकादायक ठिकाणांवरही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.स्थानिकांच्या मते, वेळेत दखल घेतल्यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली असून हा लोकहिताचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles