
KUDJE ACCIDENT:कुडजे येथे कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
KUDJE ACCIDENT:कुडजे येथे कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
पुणे:पुण्यातील कुडजे परिसरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुडजे येथील हॉटेल रामदेव समोर असलेल्या वळणावर हा अपघात झाला आहे.
अपघातानंतर कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी दुचाकीस्वाराला मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अपघातग्रस्त कार (क्र. MH12XZ0012) आणि दुचाकी (क्र. MH2QZ1472) ताब्यात घेण्यात आल्या असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.











