♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पापाचा घडा अखेर भरला! उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची कंट्रोल रुमला उचल’बांगडी’! विषारी गावठी दारुच्या भट्टीत पोलीस निरीक्षक सचिन वांगडेसह ग्रामीणचे इतर चार कर्मचारी ‘होरपळले’!

पापाचा घडा अखेर भरला! उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची कंट्रोल रुमला उचल’बांगडी’! विषारी गावठी दारुच्या भट्टीत पोलीस निरीक्षक सचिन वांगडेसह ग्रामीणचे इतर चार कर्मचारी ‘होरपळले’!

(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे: अवैध धंदेवाल्यांशी संगणमत करुन सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात कट कारस्थान करणे,खोटे गुन्हे दाखल करणे, कर्तव्य करण्याऐवजी पदाचा माज दाखविणे, हाताखाली काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर default रिपोर्ट पाठविण्याची भीती दाखवून दबाव टाकणे अशा अनेक कारणाम्यांसाठी कुख्यात असलेल्या पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यामुंळे त्यांची तडकाफडकी कंट्रोल रुमला उचल’बांगडी’ करण्यात आली असून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचा पदभार कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांत विषारी गावठी दारुमुळे तब्बल 22 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी 3, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी 6 , राज्य उत्पादन शुल्क विभागाने 13 अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आता पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी कारवाईचा बडगा उगारला असून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे 2, यवत पोलीस स्टेशन व दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील प्रत्तेकी 1 अशा एकूण 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे आणि पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची कंट्रोल रुमला रवानगी करण्यात आली आहे.

थेट आरोपीच्या संपर्कात
उरुळी कांचन पोलीस स्टेशन मधील निलंबित दोन पोलीस कर्मचारी विषारी गावठी दारू प्रकरणातील आरोपी राधेश्याम प्रजापती याच्या थेट संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क असणार हे तपासून समोर येईल.

पोलीस निरीक्षकांच्या आशिर्वादाशिवाय भट्ट्या कशा चालतील?
उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अगदी फॅक्टरी लेव्हलवर गावठी दारुच्या भट्ट्या राजरोसपणे सुरू होत्या. दररोज हजारो लिटर विषारी गावठी दारुचे प्रोडक्शन होत होते. पोलीस निरीक्षकांना याचा सुगावा कसा लागला नाही? की पैशांच्या हव्यासामुळे त्यांना गावठी दारुचा ‘वास’ आला नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस निरीक्षकांच्या आशिर्वादाशिवाय भट्ट्या चालणे शक्य नाही.

जिथे जाईल तिथे अवैध धंदेवाल्यांशी टायअप!
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी हवेली पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असतानाही अवैध धंदेवाल्यांशी टायअप केलेले होते. सध्या तब्बल 950 किलो गांजासह छत्तीसगड पोलीसांनी पकडलेला खडकवासला येथील कुख्यात गांजा व्यापारी रामदास सोनवणे याचे आणि पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचे खास संबंध होते. परिसरातील नागरिक गांजा व्यापाऱ्याला राम्या म्हणत असताना पोलीस निरीक्षक सचिन वांगडे त्याला ‘रामभाऊ’ म्हणायचे. त्याची खोटी तक्रार घेण्यासाठी खास कर्मचारी टायपिंगला बसवले जायचे. कुख्यात गांजा विक्रेता तत्कालीन हवेली पोलीसांना कधी फळ विक्रेता तर कधी रिक्षाचालक रुपात दिसायचा!

उरुळी कांचन पोलीस स्टेशन मिळावे म्हणून खेट्या!
हवेली पोलीस स्टेशनचा कार्यकाल संपत येत असताना पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशन मिळावे म्हणून सत्ताधारी पक्षातील एका आमदाराकडे अनेक खेट्या घातल्याची चर्चा होती. उरुळी कांचन पोलीस स्टेशन मिळविण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी भरपूर ‘वजन’ वापरल्याची चर्चा होती व आहे. त्यांची उचलबांगडी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गुन्हा दाखल करुन सह आरोपी करणे आवश्यक
एक दोन नव्हे तर तब्बल 22 व्यक्तींचा विषारी गावठी दारूने जीव गेलेला आहे. या गावठी दारूच्या भट्ट्या उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे सुरू होत्या. याप्रकरणी सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना केवळ कंट्रोल रुमला बसवून चालणार नाही. सचिन वांगडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना मुख्य सह आरोपी करुन अटक करण्यात यावी. त्यांना अटक केल्याशिवाय प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार नाही.

स्ट्रॉंग मेसेज गरजेचा
सरकारी पगार घेऊन कर्तव्य करण्याऐवजी अवैध धंदेवाल्यांशी संगणमत केल्याने काय परिणाम होतात याचा स्ट्रॉंग मेसेज देण्यासाठी व यापुढे पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी असे दुष्कृत्य करु नये यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी यासाठी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles