♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Khadakwasla Accident: आईवडीलांसह खारवडे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला; मद्यधुंद कारचालकाला नांदेड सिटी पोलिसांकडून अटक

Khadakwasla Accident: आईवडीलांसह खारवडे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला; मद्यधुंद कारचालकाला नांदेड सिटी पोलिसांकडून अटक

पुणे: आईवडिलांसह खारावडे येथील म्हसोबाच्या दर्शनासाठी निघालेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा खडकवासला येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यशराज निलेश कांबळे (वय 4, रा श्री कंट्रोल चौक, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
नऱ्हे परिसरात राहणारे कांबळे कुटुंबीय व इतर दोन परिवार वेगवेगळ्या दुचाकींवरुन खारावडे येथील म्हसोबाच्या दर्शनासाठी निघाले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास टाटा पंच गाडीने कांबळे यांच्या दुचाकीसह इतर काही वाहनांना जोरदार धडक दिली. चार वर्षांच्या यशराज बाजूला फेकला गेला व त्याला जबर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी नेण्यात आले परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान कार चालक अमोल गोरक्षनाथ घेगडे (वय 32, रा राजापूर ता श्रीगोंदा अहिल्यानगर) हा अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याच्या विरोधात नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. चिमुकल्या यशराजचा जीव घेणाऱ्या मद्यधुंद कार चालक अमोल घेगडे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles