
Crime News: सुमारे साडेतीन लाखांच्या फायर नोझलची चोरी करणारा मुद्देमालासह अटकेत; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
Crime News: सुमारे साडेतीन लाखांच्या फायर नोझलची चोरी करणारा मुद्देमालासह अटकेत; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
पुणे: सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या फायर नोझलची चोरी करणाऱ्या आरोपीस नांदेड सिटी पोलीसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. व्यासमुनी पाल (रा. उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी उमेश शिंदे यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
आरोपी व्यासमुनी पाल याने सुमारे 3,36,000 रुपये किंमतीचे फायर नोझल नांदेड सिटी येथील सूर बिल्डिंग परिसरातून चोरले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर उमेश शिंदे यांनी दि 15 जानेवारी रोजी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने माहिती काढून तपास करण्यात आल्यानंतर आरोपी व्यासमुनी पाल यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे, सुनील चिखले व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुलथे यांनी ही कामगिरी केली आहे. नांदेड सिटी सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड यांचेही पोलीसांना सहकार्य मिळाले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे अधिक तपास करत आहेत.








