♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Be a ‘Voter’: संमोहित न होता विचार करा…. सदसद्विवेकबुद्धीने हक्क बजवा! मतदानाला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि आपले अस्तित्व दाखवून द्या!

Be a ‘Voter’: संमोहित न होता विचार करा…. सदसद्विवेकबुद्धीने हक्क बजवा! मतदानाला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि आपले अस्तित्व दाखवून द्या!

(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे: येत्या 15 जानेवारी रोजी पुणे मनपा निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि तब्बल सात ते आठ वर्षांनी आपलं अस्तित्व दाखवून देण्याची एक अनमोल संधी आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे मतदान करण्याची! ही संधी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला डावलायची नाही. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत जी वेळ आपल्यासाठी सोईस्कर असेल त्या वेळेत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपले सर्वोच्च कर्तव्य पार पाडायचे आहे!

सध्या आमिषांची आणि आश्वासनांची खैरात सुरू आहे! संमोहित करून आपली विचारशक्ती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आपल्याला आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य निवड करायची आहे! पुढील पाच वर्षे जर हक्काने प्रश्न विचारायचे असतील तर येत्या 15 तारखेला प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य बजावायचे आहे.

हा दिवस सुट्टी घेण्याचा नाही, हा दिवस घरात बसण्याचा नाही, हा दिवस कुठंतरी फिरायला जाण्याचा नाही… हा दिवस लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा उत्सव प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावून साजरा करायचा आहे! निवडणूक आयोगाने तुम्हाला हा उत्सव साजरा करता यावा म्हणून पूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर गरोदर माता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांच्या सोयीसाठी व्यवस्था असणार आहे! द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ तुम्हाला आवाहन करत आहे की आपला हक्क बजवा आणि जागृक नागरिक बना!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles