♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खानापूर- कोंढवे धावडे महसुली मंडळात उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; नागरिकांनी विविध सेवांचा लाभ घेण्याचे हवेली उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांचे आवाहन 

खानापूर- कोंढवे धावडे महसुली मंडळात उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; नागरिकांनी विविध सेवांचा लाभ घेण्याचे हवेली उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांचे आवाहन 

 

पुणे: लोकाभिमुख प्रशासकीय कारभार राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार खानापूर व कोंढवे धावडे महसुली मंडळात उद्या दि 7 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर येथील मातोश्री गार्डन मंगल कार्यालय व कोंढवे धावडे येथील जुणे दामिनी मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजल्यापासून सदर शिबीर असणार आहे.

सदर शिबीराच्या माध्यमातून नागरिकांसाठी खालील सेवा उपलब्ध असणार आहेत.

1. प्रलंबित फेरफार

2. 7/12 मधील चुकांची दुरुस्ती

3. डिजिटल 7/12 व 8 अ उत्ताऱ्याचे वाटप करणे

4. तुकडेबंदी नियमितीकरण करणे

5. वर्ग 2 च्या जमीन वर्ग 1 करणे

6. भूसंपादन कमी जास्त पत्रक तयार

7. अकृषिक – कमी जास्त पत्रक तयार

8. अकृषिक तरतुदीची सुधारणानुसार अधिमुल्य आकारणी व वसुली करणे

9. लोकसेवा हक्क कायदा अ) जात प्रमाणपत्र

10. सामाजिक लाभाच्या योजना

अ) संजय गांधी योजना

ब) इंदिरा गांधी योजना

11. एक खिडकी योजना

अ) ई-मोजणी ब) ॲग्रीस्टॅक

क) पी.एम. किसान ड) तक्रार निवारण

 

परिसरातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन हवेली उपविभागीय अधिकारी डॉ यशवंत माने व हवेली तहसीलदार डॉ अर्चना निकम यांनी केले आहे.

 

आदिवासी कातकरी नागरिकांची विशेष दखल 

हवेली तहसीलदार डॉ अर्चना निकम व उपविभागीय अधिकारी डॉ यशवंत माने यांनी खडकवासला परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांना आधार कार्ड व जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष दखल घेतली. आदिवासी कातकरी नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles