
Murder Mistrey: मित्राच्या हातून मित्राचा अंत; किरकोळ कारणावरून चेष्टामस्करी बेतली जीवावर; डोक्यात गोळी लागली… मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडला मात्र दवाखान्यात नेण्याऐवजी भलतच केलं…
Murder Mistrey: मित्राच्या हातून मित्राचा अंत; किरकोळ कारणावरून चेष्टामस्करी बेतली जीवावर; डोक्यात गोळी लागली… मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडला मात्र दवाखान्यात नेण्याऐवजी भलतच केलं…
पुणे: पार्टी करण्यासाठी पंधरा लिटर माडी आणली, किरकटवाडी येथील गल्ली नं 8 मधील इमारतीच्या टेरेसवर पार्टी रंगली. सहा ते सात बालपणीपासूनचे मित्र माडीच्या नशेत झिंगले होते. घरच्यांचे फोन येत होते मात्र आमची पार्टी सुरू आहे सारखा फोन करू नका असं सांगण्यात येत होतं.
13 जानेवारी रोजी अकरा ते साडेअकरा दरम्यान मित्रांच्या या पार्टीत किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. बारा वाजण्याच्या सुमारास एका मित्राने मयत विशाल संजय चव्हाण याच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावला आणि काही कळण्याच्या आत आवाज झाला तसा विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला. चेष्टा मस्करीत सुरू असलेली मित्रांची पार्टी रक्तरंजित झाल्याने सर्वच घाबरले. हसत खेळत बोलणारा विशाल जिव्हारी गोळी लागल्याने निपचित पडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनी कोणालाही कळू न देता विशालचा मृतदेह कपड्यात गुंडाळून चारचाकी गाडीने डोणजे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाखाली फेकला. तोपर्यंत काहींनी रक्तकाचे डाग पुसून घडलेली घटना लपविण्याचा प्रयत्न केला. मुलगा रात्री घरी का आला नाही असे वडीलांनी पार्टीत असलेल्या काहींना विचारले परंतु त्यांनी आम्हाला माहीत नाही असे सांगितले. मात्र काही वेळातच मृतदेह आढळून आला व पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलीसांच्या वेगवान तपासामुळे घटना उघडकीस आली. सध्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार आहेत. पुणे शहर पोलीसांची पथके त्यांच्या मागावर आहेत.








