
तथाकथित हवेली आपत्ती व्यवस्थापन चा ‘आम्ही प्रवाहात अडकलोच नाही’ हा दावा खोटा; PMRDA अग्निशमन दलाला प्राप्त कॉलच्या अहवालातून ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीची सत्यता स्पष्ट
तथाकथित हवेली आपत्ती व्यवस्थापन चा ‘आम्ही प्रवाहात अडकलोच नाही’ हा दावा खोटा; PMRDA अग्निशमन दलाला प्राप्त कॉलच्या अहवालातून ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीची सत्यता स्पष्ट
पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असताना आततायीपणा करत नांदेड-शिवणे पुलापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर कुत्र्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरून स्वतःच अडकून बसलेल्या तथाकथित हवेली आपत्ती व्यवस्थापनच्या पाच जणांना वाचविण्यासाठी PMRDA अग्निशमन दलाच्या जवानांना काल कसरत करावी लागली. अक्षरशः धरणातील विसर्ग थांबवून बचावकार्य राबवावे लागले. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबतचे वास्तवदर्शी वृत्त सर्वात आधी प्रसिद्ध केले होते.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र या तथाकथित हवेली आपत्ती व्यवस्थापन च्या काहींनी गवगवा सुरू केला की ‘आम्ही पाण्यात अडकलोच नव्हतो. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे.’ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पूर्ण सत्यता पडताळून व अधिकृत माहितीच्या आधारेच बातमी प्रसिद्ध केलेली होती. धक्कादायक म्हणजे नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनाही या तथाकथित आपत्ती व्यवस्थापनच्या संबंधितांनी चूकीची माहिती देऊन त्यांचीही दिशाभूल केली होती.
अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या अग्निशमन दलाला प्राप्त कॉलच्या अहवालातून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने मांडलेले सत्य स्पष्ट झाले असून तथाकथित हवेली आपत्ती व्यवस्थापनचा खोटारडेपणा समोर आला आहे.
PMRDA अग्निशमन दलाचा अधिकृत अहवाल
नांदेड सिटी अग्निशमन केंद्र
वार बुधवार
सविनय सादर
दिनांक30/07/2025
वेळ:- 17.20
वर्दीचा प्रकार :- रेस्क्यू कॉल
वर्दीचे ठिकाण:- नांदेड सिटी सरगम बिल्डिंगच्या पाठीमागे
वर्दी देणाऱ्याचे नाव : राहुल
मो. — प्रतीक
वर्दी घेणाऱ्याचे नाव :- .वि:- तुषार पवार
वर्दीवर गेलेले वाहन :-MH-12 SF 2003
वर्दीवरती गेलेले कर्मचारी:- वा चा सानप
बनकर अ .वी : शिरसाट, चव्हाण, आव्हाड बुधवंत ,मिसाळ , जावळे , जवान – सावंत ,जवान- केदार
सदर घटनेचा तपशील
सदर घटनास्थळी पोहोचले असता हवेली आपत्ती पथक नदीपात्रामध्ये अडकलेले कुत्रे काढण्यासाठी नदीपात्रामध्ये उतरले होते अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना बाहेर येणे शक्य नसल्यामुळे पाच जणांच्या मदतीसाठी पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान पाण्यामध्ये उतरले व त्यांना रेस्क्यू करण्यात आले
पाण्यामधून काढलेले हवेली आपत्तीचे जवानांची नावे
डॉग फाउंडेशन महिला श्रद्धा सानप
सजय दगडू चोरगे
संतोष बाळू भगत
गणेश सपकाळ
प्रतीक महामुनी








