
PMC Election: प्रभाग क्र 33 मध्ये उत्तमनगर मनपा शाळेत मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाला आली भोवळ; पोलीस उपनिरीक्षक तत्परतेने धावले मदतीला
PMC Election: प्रभाग क्र 33 मध्ये उत्तमनगर मनपा शाळेत मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाला आली भोवळ; पोलीस उपनिरीक्षक तत्परतेने धावले मदतीला
पुणे: पुणे मनपा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना प्रभाग क्र 33 मधील उत्तमनगर येथील मनपा शाळेत मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाला अचानक भोवळ येऊन ते बेशुद्ध पडले. सदर मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर हे तातडीने मदतीसाठी धावले.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नागरिकाला स्वतः उचलून घेत रिक्षात ठेवून जवळच असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. भोवळ आलेल्या नागरिकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अचानक नागरिक भोवळ येऊन पडल्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदतीसाठी धाव घेतली. परिणामी संबंधित नागरिकावर तातडीने उपचार सुरू झाले आहेत.









