
Crime News: 52 लाख रुपये घेतले आणि फ्लॅट विकला दुसऱ्याला; चार महिन्यांपासून फरार आरोपीला नांदेड सिटी पोलीसांकडून अटक
Crime News: 52 लाख रुपये घेतले आणि फ्लॅट विकला दुसऱ्याला; चार महिन्यांपासून फरार आरोपीला नांदेड सिटी पोलीसांकडून अटक
पुणे: फ्लॅट विकत देण्यासाठी तब्बल 52 लाख रुपये घेऊन तो फ्लॅट दुसऱ्याला विकून फरार झालेल्या आरोपीला अखेर नांदेड सिटी पोलीसांनी अटक केली आहे. मितेश अजित फुलपगर (वय 49 रा. व्यंकटेश सेरिनिटी, डी एस के विश्व जवळ, धायरी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीने आरोपी मितेश फुलपगर याच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी 52 लाख रुपये दिले होते मात्र आरोपीने परस्पर तो फ्लॅट दुसऱ्याला विकून फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार निलेश कुलथे व शिवाजी क्षीरसागर यांना आरोपी आंबिल ओढा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निलेश कुलथे, शिवाजी क्षीरसागर, संग्राम शिनगारे,स्वप्नील मगर,निलेश खांबे, राजू वैगरे, मोहन मिसाळ, प्रतिक मोरे, सतिश खोत, भिमराज गांगुर्डे, अक्षय जाधव,रोशन मंडले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.








