♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रभाग 33 मध्ये चुरस वाढली; भाजप-शिवसेनेच्या तगड्या इच्छुकांनी ऐनवेळी ‘तुतारी’ फुंकल्याने भाजपाच्या कानठळ्या! लढत रंगतदार होणार असल्याची प्रभागात चर्चा 

प्रभाग 33 मध्ये चुरस वाढली; भाजप-शिवसेनेच्या तगड्या इच्छुकांनी ऐनवेळी ‘तुतारी’ फुंकल्याने भाजपाच्या कानठळ्या! लढत रंगतदार होणार असल्याची प्रभागात चर्चा 

(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

खडकवासला: नव्याने पालिकेत समावेश झाल्यानंतर मागील सुमारे तीन ते चार वर्षांपासून सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रभाग 33 मध्ये ऐनवेळी नाट्यमयी घडामोडी घडल्यामुळे हा प्रभाग पुन्हा एकदा चर्चेचे केंद्र बनला आहे. भाजप व सेनेच्या प्रत्येकी एका प्रबळ इच्छुकाने तुतारी फुंकून लढत एकतर्फी समजणाऱ्या भाजपाच्या उमेदवारांच्या अक्षरशः कानठळ्या बसवल्या आहेत. रणनीती आखून ‘तुतारी’ साठी झालेली जुळवाजुळव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली तटस्थ भूमिका यामुळे प्रभाग 33 मध्ये रंगतदार लढत होणार असून कोणाचा कस लागतोय आणि कोणाची पिसं निघतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. इच्छुक उमेदवारांकडून एबी फॉर्म मिळण्यासाठी आपापल्या पक्षाकडे धावाधाव सुरू होती. ज्या पक्षासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपण जीवाचे रान करुन काम केले तो पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल असं प्रत्येकाला वाटत होतं! परंतु कार्यकर्त्यांच्या मनासारखं होईल ते राजकारण कसलं! अनेकांना डावलण्यात आलं तर काहींना निवडून येण्याचं गणित जुळविण्यासाठी वेगळी वाट धरावी लागली.

प्रभाग 33 मध्ये अशाच अनपेक्षित घडामोडी घडल्या. नांदेड सिटी व नांदेड गाव असे सुमारे तेवीस हजार मतदार असलेल्या परिसराला भाजपाने डावलले. या भागाला अक्षरशः गृहित धरण्यात आल्याने इच्छुकांसह नागरिक नाराज झाले. याचाच फायदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतला व रणनीती आखत तेथील भाजपाच्या प्रबळ इच्छुकाला उमेदवारी देण्यात आली. सेनेच्या एका उमेदवारानेही वातावरणाचा अंदाज घेऊन अगदी ऐन वेळी तुतारी फुंकली! परिणामी भाजपाला सहज वाटणारी प्रभाग 33 मधील निवडणूक आता अत्यंत चुरशीची व रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles