
चाणाक्ष नांदेड सिटी पोलीस! धुराच्या वासावरून सिगारेटमध्ये गांजा असल्याचे ओळखले….. पण राजरोसपणे सुरू असलेली गांजा विक्री दिसत नसल्याने आश्चर्य!
चाणाक्ष नांदेड सिटी पोलीस! धुराच्या वासावरून सिगारेटमध्ये गांजा असल्याचे ओळखले….. पण राजरोसपणे सुरू असलेली गांजा विक्री दिसत नसल्याने आश्चर्य!
खडकवासला: अल्पवयीन मुलगा सिगारेट ओढत होता. नांदेड सिटी पोलीस स्टेशनमधील एक पोलीस कर्मचारी बाजुला उभे होते. झुरके मारण्यात दंग असलेल्या तरुणाने नाका तोंडातून धूर सोडला आणि गडबड झाली! चाणाक्ष पोलीस कर्मचाऱ्याने ‘गंध’ ओळखला! तरुण सिगारेटमध्ये गांजा भरुन नशा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला ‘कडक’ समज दिली! खडकवासला येथे ज्या ठिकाणी हे घडले तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. साहेब मुलं नशा करतात हे चुकीचंच आहे परंतु गांजा कुठं मिळतो हे तुम्हाला माहीत नाही का? आख्या पुण्याला माहित खडकवासला येथे गांजा कुठं मिळतो आणि तुम्हाला कसं माहित नाही? कारवाई तिथं जाऊन करा ना! असं नागरिकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना सुनावले.
या घटनेमुळे खडकवासला व परिसरातील भिषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. अल्पवयीन तरुण गांजाची नशा करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीसांना सगळं माहित आहे. गांजा कुठं विकला जातो? कोण गांजा व्यापारी आहे?कशा पद्धतीने रॅकेट सुरू आहे? याची सगळी माहिती पोलिसांना आहे! पण कारवाई करायची नाही! कारवाई केली तर मिळणार काय? रतीब बंद झाला तर करायचं काय? असे प्रश्न पोलीसांसमोर असावेत. नांदेड सिटी पोलीसांनी व पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कधीतरी पोलीस म्हणून व त्यासाठी आपल्याला सरकारी पगार मिळतो याचा विचार करून कारवाई करणे आवश्यक आहे. फक्त धुराचा वास घेण्यात काय अर्थ!








