
ना कोणाशी वैर ना गुन्हेगारी पार्श्वभूमी….. कष्ट करुन जगणाऱ्या कुटुंबातील तरुणावर जीवघेण्या चाकू हल्ल्याने कुटुंब चिंतेत; उपचारांसाठी लाखोंचा खर्च असल्याने शक्य त्या मदतीचे आवाहन
ना कोणाशी वैर ना गुन्हेगारी पार्श्वभूमी….. कष्ट करुन जगणाऱ्या कुटुंबातील तरुणावर जीवघेण्या चाकू हल्ल्याने कुटुंब चिंतेत; उपचारांसाठी लाखोंचा खर्च असल्याने शक्य त्या मदतीचे आवाहन
मांडवगण (श्रीगोंदा): कधीच कोणाशी वैर नाही, कोणाशी उद्धटपणे बोलणं नाही, आपण भलं आणि आपलं काम भलं अशा विचारांचा वारसा लाभलेलं मांडवगण ता श्रीगोंदा येथील रायकर कुटुंब आज होतकरू तरुणावर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्याने हादरुन गेलं आहे. आयुष्यभर कष्ट करुन मिळेल तसे चार घास सुखाने खाणारे आई-बाप आज चोवीस तास लेकराच्या काळजीत अश्रू ढाळत हुंदके देत आहेत. अहिल्या नगर येथील श्रीदिप हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, श्री सिद्धेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी प्रकृती हळूहळू सुधारत आहे. उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात आहे त्यामुळे आपली सामाजिक जबाबदारी आहे या कुटुंबाला शक्य ती मदत करुन सावरण्याची.
योगेश नंदू रायकर या तरुणावर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रोत्सवात जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. यात अत्यंत गंभीर जखमी झालेल्या योगेशवर मागील सुमारे दहा दिवसांपासून अहिल्या नगर येथील श्रीदिप हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे मात्र सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या रायकर कुटुंबाला उपचारांसाठी होत असलेला लाखोंचा खर्च न पेलवणारा आहे. अशा परिस्थितीत गावातील व चंपक्रोशीतील नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी 500 रुपये,1000रुपये किंवा आपल्याला शक्य होईल ती मदत करुन या रायकर परिवाराला आधार देणे आवश्यक आहे.
तुमची मदत थेट संबंधितांपर्यंत पोचणार आहे. तसेच मदत खात्यात जमा झाल्यानंतर दिपक रायकर हे गावातील व्हॉट्स ॲप गृपवर नावासह कळवत आहेत.
मदतीसाठी संपर्क:
दिपक संभाजी रायकर मोबा: 93708 04128
तसेच दिपक रायकर यांचा फोन पे स्कॅनर खाली जोडण्यात आला आहे. जरुर मदत पाठवा.









