♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Mandavgan Crime:ग्रामदैवताच्या उत्सवात गावगुंडांचा हैदोस;एकाच्या डोक्यात फायटरचा घाव तर एकाला चाकूने भोकसले; जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमींवर उपचार सुरू, सहा जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Mandavgan Crime:ग्रामदैवताच्या उत्सवात गावगुंडांचा हैदोस;एकाच्या डोक्यात फायटरचा घाव तर एकाला चाकूने भोकसले; जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमींवर उपचार सुरू, सहा जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

श्रीगोंदा: गावातील सण उत्सवांमध्ये जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत भांडणतंटे करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांनी मांडवगणचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेतही हैदोस घातला. किरकोळ कारणावरून एकाच्या डोक्यात फायटरचा घाव घालत बेदम मारहाण करण्यात आली तर मारहाण का केली याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या मित्राला चाकूने भोकसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात योगेश नंदू रायकर(वय 27) व परमेश्वर बाळासाहेब आनंदकर (वय 30) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर Ahilyanagar येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी प्रशांत साहेबराव चव्हाण,साहिल मच्छिंद्र चव्हाण, सुयोग मच्छिंद्र चव्हाण, सुरज संतोष चव्हाण, हेमंत चव्हाण व अविनाश उर्फ पप्पू शामराव चव्हाण यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109,115(2),352,351(2), 189(2), 191(2),191(3) व 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपी अटकेत तर काही फरार झाले आहेत.
यात्रोत्सवात पारंपरिक शोभेच्या दारुचा कार्यक्रम सुरू असताना किरकोळ कारणावरून परमेश्वर बाळासाहेब आनंदकर याला आरोपींनी डोक्यात फायटरचा घाव घालून जबर मारहाण केली. अत्यंत शांत स्वभावाच्या व कसल्याही वादविवादात नसलेल्या परमेश्वर आनंदकर याला मारहाण झाल्याने सर्व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. मित्रांनी तातडीने त्याला गावातील दवाखान्यात नेऊन उपचार सुरू केले व काही मित्र नेमकी का मारहाण केली हे विचारण्यासाठी मांडवगण येथील झेंडा चौक परिसरात गेले. तेथून परत निघत असताना दुचाकीवर बसलेल्या योगेश नंदू रायकर याच्यावर पाठीमागून धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. अक्षरशः किडनी पर्यंत चाकू घुसल्याने योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. अचानक सर्वकाही घडल्याने मोठा गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत योगेश याला अहिल्या नगर येथे उपचारांसाठी नेण्यात आले. सध्या दोघांवरही उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मांडवगण येथे वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उंटावरून शेळ्या हाकणारे श्रीगोंदा पोलीस

मांडवगणमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा, कॉलेजच्या परिसरात या गुंडांच्या टोळ्या मुलींना न्याहाळत घिरट्या घालत असतात. सातत्याने मारहाण, दहशत निर्माण करणे असे प्रकार सुरू असताना श्रीगोंदा पोलीस मात्र अवैध धंद्यांच्या वसुली व्यतिरिक्त मांडवगणकडे फिरकताना दिसत नाहीत. मांडवगणमध्ये दूर क्षेत्र मंजूर असताना कधीही संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तेथे बसत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून गुन्हेगारी वाढत चालली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अक्षीक्षकांनी अशा कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर व बेजबाबदार प्रभारी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

शस्त्र हातात घेऊन रिल्स
आरोपींकडून सातत्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू असून सोशल मीडियावर राजरोसपणे धारदार तलवारी, पिस्तूल हातात घेऊन रिल्स, फोटो टाकण्यात आलेले आहेत. या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्याची मागणी सर्व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच आरोपी राजरोसपणे शस्त्रास्त्रे घेऊन वावरत असताना श्रीगोंदा पोलीस गोट्या खेळत बसतात की काय? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

हातात धारदार शस्त्र पिस्तूल घेऊन सोशल मीडियावर फोटोबाजी

बेमुदत गाव बंद ठेवण्यात येणार
यात्रोत्सवात घडलेल्या संतापजनक घटनेमुळे मांडवगणचे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यातच आरोपी फरार असल्याने पोलीसच आरोपींना पाठीशी घालत आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामस्थांनी बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून तसे निवेदन आहिल्या नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles