♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवजड वाहतूक बंदी नावालाच; खडकवासला धरणामागील धोकादायक पुलावरून ‘गर्डरच्या खालून’ अवजड वाहतूक सुरुच;’अवजड वाहतूक बंदी’चा फलकही अज्ञातांनी तोडला

अवजड वाहतूक बंदी नावालाच; खडकवासला धरणामागील धोकादायक पुलावरून ‘गर्डरच्या खालून’ अवजड वाहतूक सुरुच;’अवजड वाहतूक बंदी’चा फलकही अज्ञातांनी तोडला

 

पुणे: खडकवासला धरणामागील पूल धोकादायक झाल्याने प्रशासनाने गर्डर लावून अवजड वाहतूक बंद करण्याचा ‘दिखावा’ केला,कारण गर्डरच्या खालून सर्व प्रकारची अवजड वाहने बिनदिक्कतपणे ये-जा करताना दिसत आहेत. त्यामुळे गर्डर रेल्वे जाऊ नये म्हणून बसविले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवजड वाहतूकीस बंदीचा फलकही जाणीवपूर्वक तोडण्यात आला आहे.

खडकवासला धरणामागील पूल धोकादायक झाल्याने काही दिवसांपूर्वी लोखंडी गर्डर बसविण्यात आले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना गर्डर बसवून फलक लावण्यात आले होते. मात्र हा केवळ फार्स असल्याचे स्पष्ट झाले असून दोन्ही बाजूंच्या गर्डर खालून सर्व प्रकारची अती अवजड वाहने बिनदिक्कतपणे ये-जा करत आहेत. तसेच माहितीसाठी लावलेला फलकही अज्ञातांनी तोडून टाकला आहे.

 

वास्तव काय?

खडकवासला धरणामागील पूल 1960 साली बांधण्यात आलेला असून दरवर्षी धरणातून विसर्ग सोडण्यात येत असल्याने बांधकाम जीर्ण झालेले आहे. पुलाच्या आधाराचा बराच भाग वाहून गेलेला असून जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. प्रशासनाने पाहणी करुन पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे.

 

गर्डरची उंची कशी वाढली?

मंजूर गर्डर आणि प्रत्यक्षात बसविण्यात आलेला गर्डर यात तफावत आहे. तीन मीटर उंचीवर गर्डर प्रस्तावित असताना तो साडेतीन मीटरवर बसविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारची अवजड वाहने विना अडथळा ये-जा करत आहेत. उंची वाढवून हा निरुपयोगी गर्डर बसवून दिखावा का करण्यात आला? कोणाच्या सांगण्यावरून ही उंची वाढविण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवीन पूल बांधणीकडे दुर्लक्ष 

सध्याचा पूल बांधला तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप तफावत आहे. हजारो पटीने वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. असे असताना या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आलेला नाही. दरवर्षी या भागातील केंद्रीय संस्थांमध्ये केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी याच पूलावरुन जातात मात्र कोणीही या पूलाची दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींना येथे नवीन पूल बांधावा असे कधी वाटले नाही हे दुर्दैव! पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची वेळ येईपर्यंत पर्यायी व्यवस्था का करण्यात आलेली नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

 

रिंग रोडचे ‘गणित’!

सध्या या भागात रिंग रोडचे काम अत्यंत वेगात सुरू असून याच पुलावरून पन्नास-पन्नास टन वजनाचे शेकडो डंपर जात आहेत. गर्डर बसविण्याचे काम सुरू झाल्यानंतर रिंग रोडचे ‘गणित’ बिघडणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच गर्डरची उंची वाढल्याने रिंग रोडच्या ठेकेदारांनी या गर्डरची उंची वाढविण्यासाठी ‘टेकू’ लावला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles