
हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अपघात, एकाचा मृत्यू परंतु अपघात कसा झाला याचा तपास नाही
हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अपघात, एकाचा मृत्यू परंतु अपघात कसा झाला याचा तपास नाही
पुणे: हवेली पोलीस स्टेशन हद्दीत डीआयएटी गेट ते ॲक्वेरिअस हॉटेल दरम्यान धायरी येथे राहणाऱ्या व्यक्तीचा अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला मात्र अपघात कोणत्या वाहणाला धडकून झाला याचा तपास अद्याप लागलेला नाही. परेश राजेंद्र तटकर (वय 39 रा धायरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
5 ऑक्टोबर रोजी परेश तटकर हे आपल्या मित्रांसह फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले होते. तिथून ते पार्टी करुन निघून आले मात्र मित्रांनी परत फोन करून बोलावून घेतल्याने खडकवासला चौपाटीपासून परत फिरले. डीआयएटी गेट ते ॲक्वेरिअस हॉटेल च्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन पडले.
परेश तटकर यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु दुर्दैवाने गंभीर जखमा व रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अद्याप हवेली पोलीसांना या अपघाताचे कारण व ज्या वाहनाने अपघात झाला ते वाहन आढळून आलेले नाही. हवेली पोलीसांकडून तपासात हलगर्जीपणा होत आहे की जाणीवपूर्वक तपासाकडे दुर्लक्ष केले जात आहे हे समजू शकले नाही. याप्रकरणी गांभीर्याने तपास करुन अपघाताचे कारण व वाहन शोधून काढावे अशी मागणी मृत परेश तटकर याच्या संबंधितांकडून करण्यात येत आहे.








