
हवेली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास; पेढे वाटून आनंद साजरा
हवेली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास; पेढे वाटून आनंद साजरा
पुणे: स्वतः चांगला आहे हे दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी अवैध धंदे वाल्यांना हाताशी धरुन निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, तक्रारी दाखल न करुन घेणे, तक्रार अर्ज न स्विकारने, पदाचा धाक दाखवून मनमानी करणे आणि केविलवाणे तोंड करुन सहानुभूती मिळविणे यामुळे कुप्रसिद्ध झालेल्या हवेली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची अखेर बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षकाची बदली झाल्याने हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक समाधान व्यक्त करत असून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. तसेच कावेबाज असलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ही बलामत आता कोणाचे आयुष्य खराब करतेय की कुकर्माचे फळ भोगतेय त्याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे.
आपल्या चांगल्या कामामुळे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत मदत केल्याने पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर अनेक वेळा नागरिक भाऊक झालेले दिसतात. चांगल्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर नागरिक सन्मानाने निरोप देतात. हवेली हद्दीत मात्र याच्या उलट सगळं दिसत आहे. अवैध धंदेवाले आणि काही लाळचाटे वगळता इतर कोणीही चांगलं बोलताना दिसत नाही. एकदाची पिडा गेली असा भाव सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे!








