♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Impact News: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चा पाठपुरावा; एनडीए-बहुली रस्त्यावरील गतीरोधकांची रंगरंगोटी सुरू;अपघातांचा धोका टळल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान 

Impact News: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चा पाठपुरावा; एनडीए-बहुली रस्त्यावरील गतीरोधकांची रंगरंगोटी सुरू;अपघातांचा धोका टळल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान

 

पुणे: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर एनडीए-बहुली रस्त्यावरील गतीरोधकांना रंग देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रंग दिल्याने वाहनचालकांना गतीरोधकांचा अंदाज येऊ लागल्याने अपघातांचा धोका टळला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

एनडीए- बहुली रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीरोधक तयार करून घेतले होते मात्र रंगरंगोटी केलेली नव्हती. परिणामी त्यावर वाहने आदळून अनेक अपघात झाले होते. नागरिकांनी याबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला व अखेर आज कामाला सुरुवात झाली आहे.

 

“गतीरोधक दिसत नसल्याने मागील काही दिवसांपासून दररोज अपघात होत होते. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेत पाठपुरावा केला. कमळजाई मंदिरापर्यंत असलेल्या लहानमोठ्या सर्व गतीरोधकांची रंगरंगोटी करणे आवश्यक आहे.” सुनील पायगुडे, नागरिक.

कुडजे येथील गतिरोधकाची रंगरंगोटी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले

“गतीरोधक तयार करण्यासाठी व रंगरंगोटी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने संपर्क केला होता. आज अखेर काम सुरू झाले असून आता अपघात कमी होतील. वळणांच्या ठिकाणी अधीक पट्टे मारणे आवश्यक आहे.” नितीन वाघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, खडकवासला विधानसभा प्रमुख.

 

“पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्याने काही दिवस कामास विलंब झाला. रंगाचे काम असल्याने पाऊस थांबल्याशिवाय काम करणे शक्य नव्हते. सर्व गतीरोधक व इतर आवश्यक ठिकाणी पट्टे मारुन घेण्यात येतील. अपघातांना प्रतिबंधक करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आवश्यक उपाययोजना करत आहे.” नामदेव राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles