♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांची तत्परता; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर अत्यवस्थ आदिवासी कातकरी तरुणाच्या उपचारांसाठी धावाधाव; ससून रुग्णालयात तातडीने उपचारांची व्यवस्था

हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांची तत्परता; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर अत्यवस्थ आदिवासी कातकरी तरुणाच्या उपचारांसाठी धावाधाव; ससून रुग्णालयात तातडीने उपचारांची व्यवस्था

 

पुणे: हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचारांअभावी मरणासन्न अवस्थेत झोपडीत पडून असलेल्या आदिवासी कातकरी तरुणाच्या उपचारांसाठी हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क करत तातडीने उपचारांची व्यवस्था केली आहे. तहसीलदार किरण सुरवसे यांच्या सूचनेनुसार कोंढवे धावडे गावचे ग्राम महसूल अधिकारी आकाश घुगे हे समन्वयासाठी ससून रुग्णालयात थांबून आहेत.

एनडीए 10 नंबर गेट जवळील आदिवासी कातकरी वस्तीवरील अनिल हनुमंत वाघमारे (वय 27) या तरुणाची प्रकृती मागील काही दिवसांपासून चिंताजनक आहे. कागदपत्रे नसल्याने उपचारांसाठी शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता. माजी आमदार कै. रमेश वांजळे यांचे लहान बंधू राजू वांजळे यांनी आर्थिक मदत केल्याने काही दिवस खडकवासला येथील खाजगी रुग्णालयात अनिल वाघमारे याच्यावर उपचार करण्यात आले मात्र प्रकृती बिघडत चालल्याने दुसरीकडे हलवने आवश्यक होते.

याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. कोंढवे धावडे मंडळाचे प्रभारी मंडळाधिकारी किशोर पाटील, तलाठी आकाश घुगे यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांच्या सुचनेनुसार ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करुन घेतली. अखेर अनिल वाघमारे याच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.

 

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ची सक्रीय मदत 

केवळ बातमी न करता अनिल वाघमारे याला उपचार मिळावेत म्हणून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने महसूल प्रशासनाच्या बरोबरीने सामाजिक जबाबदारी स्वीकारून 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली. अनिल वाघमारे याला रुग्णवाहिकेत बसवून प्रशासन आणि आदिवासी कातकरी यांच्यातील दुवा म्हणून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने भूमिका निभावली. चांगले उपचार मिळावेत म्हणून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles