
Crime News: सराईत गुन्हेगार धारदार शस्त्रासह जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई
Crime News: सराईत गुन्हेगार धारदार शस्त्रासह जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई
पुणे: खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला धारदार फाल्गन सह गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने जेरबंद केले आहे. महेश पांडुरंग भगत (वय 32, रा.रामनगर मनपा शाळेजवळ,वारजे) अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर व तुषार किंद्रे हे वारजे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी महेश भगत याच्याबाबत माहिती मिळाली. वारजे पुलाखालील हरिभाऊ पाटलु उद्यानाजवळ आरोपी महेश भगत यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे धारदार फाल्गन आढळून आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या सूचनेनुसार व युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अमोल काटकर, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.








