♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चार दिवसांपासून अवजड डंपर रस्त्यावर उभा;अरुंद रस्ता असल्याने अपघाताचा धोका;किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील बापूजीबुवा नगर परिसरातील स्थिती 

चार दिवसांपासून अवजड डंपर रस्त्यावर उभा;अरुंद रस्ता असल्याने अपघाताचा धोका;किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील बापूजीबुवा नगर परिसरातील स्थिती 

 

किरकटवाडी: अगोदरच अरुंद असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर मागील चार दिवसांपासून नादुरुस्त असलेला अवजड डंपर उभा असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून दुर्घटना घडण्याच्या अगोदर डंपर काढून घेण्याची आवश्यकता आहे.

ज्या ठिकाणी डंपर उभा आहे तेथे मागून बापूजीबुवा नगरकडे जाण्याचा रस्ता आहे. डंपर रस्त्यावर उभा असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने दिसत नाहीत. तसेच आत वळन घेतानाही वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहनांनाही या उभ्या असलेल्या डंपरमुळे अडथळा निर्माण होत आहे.

या उभ्या असलेल्या डंपरवर आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांनी हा डंपर रस्त्यातून बाजूला करुन घेणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles