
कोल्हेवाडी येथून एक पिस्तूल दोन जिवंत काडतूसांसह एक अटकेत; गुन्हेशाखेच्या पथकाची कारवाई;दोन दिवसांपूर्वी कारमध्ये आढळली होती धारदार शस्त्रे
कोल्हेवाडी येथून एक पिस्तूल दोन जिवंत काडतूसांसह एक अटकेत; गुन्हेशाखेच्या पथकाची कारवाई;दोन दिवसांपूर्वी कारमध्ये आढळली होती धारदार शस्त्रे
खडकवासला: कोल्हेवाडी येथे सातत्याने गावठी पिस्तूल व इतर धारदार शस्त्रे आढळून येत असून काल गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसांसह एकाला अटक केली आहे. ओंकार पांडुरंग चरेकर (वय 20, रा. गल्ली नं 1, कोल्हेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दोन दिवसांपूर्वी कोल्हावाडी चौकात भर दिवसा एका कारमध्ये धारदार शस्त्रे आढळून आली होती.
गुन्हे शाखा युनिट-3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस हवालदार अमोल काटकर,कैलास लिम्हण, पोलीस शिपाई तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला, असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन कारवाई करण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशन व नादेंड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व कैलास लिम्हण यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार ओंकार पांडुरंग चरेकर यास कोल्हेवाडी चौकात सापळा रचून अटक करण्यात आली आहे.पुढील कारवाईसाठी आरोपीस नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) ,निखिल पिंगळे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-1यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार भाऊसाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट-3 गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु,पोलीस अमंलदार अमोल काटकर, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांच्या पथकाने केली आहे.








