
Social Dahi Handi:धायरीत दहीहंडी निमित्त भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन; अनावश्यक खर्च टाळत मनसे’कडून सामाजिक बांधिलकीचा संदेश
Social Dahi Handi:धायरीत दहीहंडी निमित्त भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन; अनावश्यक खर्च टाळत मनसे’कडून सामाजिक बांधिलकीचा संदेश
पुणे:धायरी परिसरातील दहीहंडी उत्सवाला यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विभागाने भक्तिमय आणि सामाजिक स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे. शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 6 ते रात्री 10 या वेळेत पोकळे वडापाव समोर, गणेश नगर, धायरी येथे भव्य अन्नकोट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी धायरी फाटा ते धायरी गाव परिसरात दहीहंडी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जमतात. याच पार्श्वभूमीवर, यंदा दहा हजारांहून अधिक गोविंदा, गोपाळ आणि श्रद्धाळूंसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक शिवाजी वसंतराव मते आणि सोनाली पोकळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहर) यांनी सांगितले की, “दहीहंडी हा केवळ क्रीडाप्रकार न राहता भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा, यासाठी अन्नकोट उपक्रम हाती घेतला आहे. भाविकांमधील ऐक्य, बंधुभाव आणि आनंद वृद्धिंगत होणे हेच या सोहळ्याचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट आहे.धायरीकरांसाठी हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, भक्ती आणि आनंदाचा संगम ठरणार आहे.”









