
Crime News:हत्येचा प्रयत्न, मोक्का अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आरोपींना दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतूसांसह अटक; गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई
Crime News:हत्येचा प्रयत्न, मोक्का अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आरोपींना दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतूसांसह अटक; गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई
पुणे:हत्येचा प्रयत्नासह मोक्का सारख्या गंभीर गुन्हयातील फरार आरोपींना 2 गावठी
पिस्तूल व 2 जिवंत काडतुसांनसह गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने जेरबंद केले आहे. विरफकीरा युवराज कांबळे (वय 25 वर्ष रा. साई गणेश अपार्टमेंन्ट
प्लॅट नं 405, देशमुखवाडी, वेलनेस मेडीकल जवळ शिवणे) व आर्यन ऊर्फ सुर्या लक्ष्मण
चाफेकानडे (वय 20 वर्ष रा. स्वामीनारायण मंदीरापाठीमागे न-हेगाव पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्दीत स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या तक्षशिला सोसायटीसमोर असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. दोघांनाही पुढील कार्यवाहीसाठी सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा),निखिल पिंगळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, राजेंद्र मुळीक, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा युनिट-3, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार अमोल काटकर, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, मोहम्मद
शेख, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांच्या पथकाने केली आहे.








