♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हवेली तहसिलदारांचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; वादातील पाणंद रस्ता झाला पक्का! महसूल दिनानिमित्त त्याच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांचा सन्मान!

हवेली तहसिलदारांचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; वादातील पाणंद रस्ता झाला पक्का! महसूल दिनानिमित्त त्याच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांचा सन्मान!

 

खेड शिवापूर: वर्षानुवर्षे वादात अडकलेला पाणंद रस्ता खुला करण्याचे आदेश हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सहकार्य भावनेने जागा सोडून सकारात्मक प्रतिसाद दिला. अवघ्या काही दिवसांमध्ये केवळ पायवाट असलेल्या कच्च्या रस्त्याचे रुपांतर डांबरीकरण करुन पक्क्या रस्त्यात झाले! आज त्याच रस्त्याच्या दुतर्फा महसूल सप्ताहानिमित्त हवेली तहसीलदार,इतर अधिकारी व पदाधिकारी, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आणि जागा सोडणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

हवेली तालुक्यातील खेड शिवापूर महसूल मंडळातील श्रीरामनगर ते गाऊडदरा या दरम्यानचा पाणंद रस्ता अनेक वर्षे वादात अडकला होता. या रस्त्याची स्थळपाहणी व इतर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. या आदेशाला संबंधित शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यासाठी जागा सोडली. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे सध्या रुप बदलून गेले आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने सर्वांची गैरसोय दूर झाली आहे.

आज महसूल सप्ताहानिमित्त याच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले व शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे, महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार,मंडळाधिकारी सुर्यकांत पाटील, किशोर पाटील, संदीप शिंदे, गौतम ढेरे, सचिन चव्हाण, सचिन काळे, गोपाळ जाधव, कविता चव्हाण, पवार, संकेत बेरड, ग्राम महसूल अधिकारी रवी काळे, मनोज तेलंग, शंकर दिवेकर आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles