
राजगड पोलीस ठाण्यात सेटलमेंटसाठी बसणारा तथाकथित पत्रकार कोण? …..ज्याच्यामुळे कोणाला घडणार कंट्रोलची ‘ती वारी’?
राजगड पोलीस ठाण्यात सेटलमेंटसाठी बसणारा तथाकथित पत्रकार कोण? …..ज्याच्यामुळे कोणाला घडणार कंट्रोलची ‘ती वारी’?
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये राजरोसपणे बसून काही पोलीसांशी ‘हातमिळवणी’ करत सेटलमेंट चा धंदा करणाऱ्या एका तथाकथित पत्रकाराचा भांडाफोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करत केला. एवढंच नाही तर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांची भेट घेऊन दोषी पोलीस व संबंधित पत्रकार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे या तथाकथित पत्रकाराशी संबंधित असलेल्या कोणाला आता कंट्रोल ची ‘ती वारी’ घडतेय याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
राजगड पोलीस स्टेशन परिसरात आणि हद्दीत हा तथाकथित पत्रकार काही पोलीस, झीरो पोलीस यांच्याशी मिळून अवैध धंदे सुरू असतील तर आम्ही सेटलमेंट करुन देतो असे म्हणत फिरत असल्याचे आंदोलकांनी पुराव्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान आंदोलकांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असता विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.
नेमका पत्रकार कसला?
संबंधित तथाकथित पत्रकार हा पुणे शहर सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हवेली पोलीस स्टेशन , राजगड पोलीस स्टेशन अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेवाल्यांसाठी एजंट म्हणून काम करतो. या तथाकथित पत्रकाराने समाजोपयोगी एकही बातमी केल्याचे आढळून येत नाही. अवैध धंदेवाल्यांचे तळवे चाटून पोलीसांना पत्रकारितेचा धाक दाखवून तोड्या करत फिरत राहायचं हा या तथाकथित पत्रकाराचा धंदा आहे. सखोल तपास झाल्यास याला साथ देणाऱ्या अनेक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कंट्रोल ची ‘ती वारी’ घडू शकते. तसेच अवैध धंदे वाल्यांची साखळी उघड होऊ शकते.
लाळचाटू तथाकथित पत्रकाराची रेकॉर्डिंग द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’कडे
या लाळचाटू तथाकथित पत्रकाराची अवैध धंदेवाल्यासाठी सेटलमेंट करण्यासाठी केलेल्या फोनची संपूर्ण रेकॉर्डिंग ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’कडे आहे. महत्वाचे म्हणजे या रेकॉर्डिंग ची तांत्रिक पडताळणी करुन घेण्यात आलेली असून त्याची प्रमाणपत्रे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस कडे आहेत. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी दोषी पोलीसांवर कारवाई करताना या तथाकथित पत्रकारावरही कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.








