♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sinhagad Road Accident: अवजड डंपरमुळे मुख्य सिंहगड रस्त्यावर चिखल; CWPRS गेट ते किरकटवाडी फाटा दरम्यान दुचाकी घसरून अनेक नागरिक जखमी; कारवाईकडे वाहतूक पोलीस आणि मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

Sinhagad Road Accident: अवजड डंपरमुळे मुख्य सिंहगड रस्त्यावर चिखल; CWPRS गेट ते किरकटवाडी फाटा दरम्यान दुचाकी घसरून अनेक नागरिक जखमी; कारवाईकडे वाहतूक पोलीस आणि मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

 

पुणे: अत्यंत वर्दळीच्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुख्य सिंहगड रस्त्यावर अवजड डंपरमुळे मोठ्या प्रमाणात चिखल आला असून अनेक दुचाकी घसरुन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. CWPRS गेट ते किरकटवाडी फाटा दरम्यान या चिखलामुळे रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून दररोज नागरिक जखमी होत असताना नांदेड सिटी वाहतूक विभाग व पुणे मनपा प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

या ठिकाणी रस्त्याच्या कडेने अवजड डंपर उभे केलेले असतात. डंपरने ये-जा करुन रस्त्याच्या कडेला चिखल झाला असून डंपर निघताना चाकाला चिकटलेला चिखल मुख्य रस्त्यावर येत आहे. परिणामी रस्ता चिखलमय झाला असून सततच्या संततधारेमुळे यावरुन दुचाकी घसरुन अपघात होत आहेत.

आज सकाळपासून तीन ते चार दुचाकी घसरुन महिला व पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. यापुर्वीही या ठिकाणी अनेक वेळा दुचाकी घसरुन अपघात झालेले आहेत. असे असताना वाहतूक पोलीस व पुणे मनपा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. जवळच पावत्यांसाठी टपून बसलेल्या वाहतूक पोलीसांनी नागरिकांना या रस्त्यावरून सुखरुप प्रवास करता यावा यासाठीही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मनपा प्रशासनाने या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles