♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पिसाळलेल्या कुत्र्याने पाच चिमुकल्यांना घेतला चावा; जयप्रकाश नारायण नगर, गोसावी वस्तीतील घटना; पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी 

पिसाळलेल्या कुत्र्याने पाच चिमुकल्यांना घेतला चावा; जयप्रकाश नारायण नगर, गोसावी वस्तीतील घटना; पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी 

 

सिंहगड रोड: जयप्रकाश नारायण नगर व गोसावी वस्ती परिसरात काल एका पिसाळलेल्या कुत्र्याने पाच चिमुकल्यांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाचही मुलांवर खडकवासला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून ससून रुग्णालयात नेऊन रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. दरम्यान किरकटवाडी, खडकवासला, नांदेड,धायरी या भागात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांचा पालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

काल जयप्रकाश नारायण नगर येथील तीन व गोसावी वस्ती येथील दोन अशा एकूण पाच चिमुकल्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. जयप्रकाश नारायण नगर येथे नागरिकांनी आरडाओरड केल्याने कुत्रा खाली गोसावी वस्तीच्या दिशेने पळत गेला व तेथे दोन मुलांना चावा घेतला. या घटनेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली असून पालिकेने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

हनुमंत शिवूर, म्हसू कांबळे, निखिल कांबळे, मयुर कांबळे, कोंडीबा बाळशंकर, अंबादास बाळशंकर यांनी जखमी मुलांना प्रथमोपचार करण्यासाठी व ससून रुग्णालयात नेऊन रेबीज प्रतिबंधक लस देण्यासाठी धावपळ केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles