
Crime update: मोक्कातील फरार आरोपी अटकेत; गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई
Crime update: मोक्कातील फरार आरोपी अटकेत; गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई
पुणे: खुनाचा प्रयत्न व मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या फरार सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने अटक केली आहे. शुभम सतिष डोके(वय 19 , रा.मेमाणे सोसायटी, बजरंग चौक, न-हे गाव पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-3 कडून मागील काही दिवसांपासून सातत्याने धडक कारवाया सुरू असून सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येत आहे.
दि 14 सप्टेंबर रोजी रेकॉर्डवरील तडीपार व मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी निर्देश दिल्याने सिहंगड रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट-3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहाय्यक फौजदार पंढरीनाथ शिंदे,पोलीस हवालदार अमोल काटकर, कैलास लिम्हण, पोलीस शिपाई पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे असे पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली कि भारती विदयापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. 403/2025 भान्यासं. 109(1),3(5) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील पाहीजे आरोपी शुभम सतिष डोके हा नवले ब्रिज येथे आला आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी युनिट-3 च्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त गुन्हे ,निखील पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, गणेश इंगळे सहा. पोलीसआयुक्त गुन्हे -1, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -3 चे भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक ,ज्ञानेश्वर ढवळे सहा पोलीस निरीक्षक, पंढरीनाथ शिंदे सहा पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अमंलदार अमोल काटकर, कैलास निम्हण, पोलीस शिपाई तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांच्या पथकाने केली आहे.








