
NWA गेट समोरील तात्पुरते दुभाजक पूर्ण तुटले;अपघाताचा धोका असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज
NWA गेट समोरील तात्पुरते दुभाजक पूर्ण तुटले;अपघाताचा धोका असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज
सिंहगड रोड:
अंडरपासचे काम सुरू असल्याने सध्या एकाच बाजूने पूर्ण वाहतूक सुरू आहे. काम सुरू करताना या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक दुभाजक बसविण्यात आले होते. सध्या एकही प्लास्टिक दुभाजक उभा दिसत नाही त्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक वेळा वाहने समोरासमोर आल्याने अपघाताचे प्रसंग उद्भवत आहेत.
या ठिकाणी दोन्ही बाजूंना निर्मनुष्य परिसर असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. परिणामी एखाद्या वाहनचालकास अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यात एखाद्या नागरिकाचा नाहक बळी जाण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच काम करताना संबंधित ठेकेदाराने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. याकडे पुणे शहर वाहतूक पोलीसांनीही लक्ष देण्याची गरज आहे.