
नांदेड सिटी पोलीसांची खडकवासला चौपाटी येथे नाकाबंदी तर हवेली पोलीसांचा इव्हेंट ला बंदोबस्त? एकाच रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर दिसला विरोधाभास
नांदेड सिटी पोलीसांची खडकवासला चौपाटी येथे नाकाबंदी तर हवेली पोलीसांचा इव्हेंट ला बंदोबस्त? एकाच रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर दिसला विरोधाभास
खडकवासला: खडकवासला गावची हद्द आता शहर आयुक्तालयातील नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत आलेली असल्याने नांदेड सिटी पोलीस स्टेशन कडून खडकवासला धरण चौपाटी येथे नाकाबंदी करण्यात आली होती. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची येथे कसून तपासणी करण्यात येत आहे. जे नियम मोडून वाहन चालविताना आढळत आहेत अशांवर कारवाई करण्यात येत आहे.
शहर पोलीसांच्या नाकाबंदी पासून अवघ्या काही अंतरावर ग्रामीण पोलीसांची हद्द सुरू होते. तेथून जवळच हवेली पोलीसांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी धुळवडीच्या खाजगी इव्हेंट ला बंदोबस्त दिल्याचे चित्र दिसून येत होते? रस्त्यावर लागलेल्या वाहनांच्या रांगा व रस्त्यावर येणारे तरुण तरुणी यांना सुरळीत करण्यासाठी हे पोलीस कार्यरत असल्याचे दिसून आले.
सिंहगड रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर पोलीस प्रशासनाचा असा विरोधाभास दिसून येत होता. नांदेड सिटी पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदीचा मद्यपान करून आलेल्या किंवा येत असलेल्या तरुणांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत असून काही पुन्हा माघारी वळून जात आहेत. वरच्या हद्दीत मात्र सर्व काही आलबेल सुरू आहे. कदाचित ग्रामीण हद्दीत धुलवड अत्यंत उत्साहात साजरी झाली अशा बातम्या टाईप करुन देण्याचं कामही प्रगतीपथावर असेल!