
प्रभाग क्र.33मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप; निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष
प्रभाग क्र.33मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप; निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष
.
पुणे: पुणे मनपा निवडणुकीसाठी प्रचार संपल्यानंतर प्रभाग क्रमांक 33 मध्ये काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू आहे करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन पैसे वाटप सुरू असताना निवडणूक आयोगाचे भरारी पथक व पोलीस यंत्रणा कोठेही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे सगळं नियोजित सुरू आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे.
आज सकाळपासून नांदोशी सणसनगर भागात पैसे वाटण्यास सुरुवात झाली आहे. घरोघरी जाऊन पैसे वाटप करण्यात येत असून हा पैसा कोणत्या चिन्हासाठी आहे हे सांगण्यात येत आहे. राजरोसपणे हे सगळं सुरू असताना निवडणूक आयोगाचे भरारी पथक, पोलीस यंत्रणा कोठे आहे?
हास्यास्पद गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग व पोलीसांची चेक पोस्ट खडकवासला धरण चौपाटीवर आहे. प्रभागात सावळागोंधळ सुरू असताना चेक पोस्टवर बाहेरच्या पर्यटक व नागरिकांची वाहने तपासून त्यांना मनःस्ताप देत बसण्याच्या पलिकडे त्या चेक पोस्ट चा उपयोग झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार सुरू आहे. परिणामी यंत्रणांना हाताशी धरून हे पैसे वाटप सुरू आहे का? नसेल तर यंत्रणा का दुर्लक्ष करत आहेत? या प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणांनी द्यायला हवीत.








