IMPACT: NWA गेट समोरील धोकादायक दुभाजकाच्या फटीत डांबर भरले परंतु किती दिवस टिकणार यावर प्रश्नचिन्ह
IMPACT: NWA गेट समोरील धोकादायक दुभाजकाच्या फटीत डांबर भरले परंतु किती दिवस टिकणार यावर प्रश्नचिन्ह
सिंहगड रोड: राष्ट्रीय जल अकादमीच्या (NWA) गेट समोर अंडरपासचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धोकादायक दुभाजकाच्या फटीत अखेर डांबर भरुन घेण्यात आले आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ने लक्ष वेधल्यानंतर याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे मात्र अत्यंत कमी जाडीचा व कमी गुणवत्तेचा हा डांबराचा थर असल्याने ते किती दिवस टिकेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र तात्पुरता का होईना दुचाकिस्वारांना दिलासा मिळाला आहे.
NWA गेटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम सुरू असल्याने वाहतूक एकाच बाजूने वळविण्यात आलेली आहे. त्यासाठी दोन जागी दुभाजकाचा काही भाग काढण्यात आलेला आहे. वाहनांची वर्दळ जास्त असल्याने दुभाजक काढलेल्या जागी असलेली माती निघून गेल्याने मोठी फट पडली होती. त्यात दुचाकीचे चाक गेल्यानंतर स्लीप होऊन अनेक नागरिक जखमी झाले होते.
याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने सदर फटीत डांबर भरून घेण्यात आले आहे. मात्र अत्यंत कमी जाडीचा व कमी गुणवत्तेचा हा डांबराचा थर असल्याने तो जास्त दिवस टिकणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान तात्पुरता का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.