
Explosive Vehicles: धक्कादायक…… सिंहगड रस्त्यावरील CWPRS गेट ते खडकवासला दरम्यान रस्त्याच्या कडेने स्फोटकांनी भरलेली वाहने असतात बेवारसपणे उभी; मागील काही दिवसांपासून ही वाहने उभी राहत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
Explosive Vehicles: धक्कादायक…… सिंहगड रस्त्यावरील CWPRS गेट ते खडकवासला दरम्यान रस्त्याच्या कडेने स्फोटकांनी भरलेली वाहने असतात बेवारसपणे उभी; मागील काही दिवसांपासून ही वाहने उभी राहत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
खडकवासला: सिंहगड रस्त्यावरील CWPRS गेट ते खडकवासला दरम्यान मुकाईनगर भागात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा स्फोटकांनी भरलेली वाहने बेवारसपणे उभी असलेली दिसत आहेत. दररोज रात्री हे धक्कादायक दृश्य दिसत असताना गस्त घालणारे पोलीस, मार्शल यांना ही वाहने दिसत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत असून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही दिवसांपासून या परिसरात दररोज रात्री स्फोटकांची वाहतूक करणारी तीन ते चार मोठी वाहने उभी असलेली दिसत आहेत. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने याबाबत पाहणी केली असता या वाहनांसाठी कोणतेही सुरक्षारक्षक नाहीत. अक्षरशः बेवारसपणे ही वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी ही वाहने उभी करण्यात येतात तेथे वरुन उच्चदाब वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर ही आहे. शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे आग लागल्यास आणि ती या स्फोटके असलेल्या वाहनांपर्यंत गेल्यास अत्यंत भीषण दुर्घटना घडू शकते.
स्फोटकांची वाहतूक करणारी ही सर्व वाहने आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील असल्याचे नोंदणी क्रमांकावरुन दिसून येत आहे. कदाचित रिंग रोडच्या कामासाठी ही स्फोटके वापरली जात असण्याची शक्यता आहे परंतु संबंधित ठेकेदारांकडून स्फोटकांबाबत अत्यंत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. मोठ्या रहिवासी इमारती अगदी लागून आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. स्फोटकांची वाहतूक करणारी ही वाहने अशाप्रकारे धोकादायक स्थितीत लावून जाणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच या वाहनांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करणे गरजेचे आहे.








