♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

किरकटवाडी जिल्हा परिषद शाळेचे अठरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

पुणे: राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत किरकटवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. वर्गशिक्षक सुनिल साखरे, संगिता शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रणव राम बाळशंकर, विवेक नामदेव पंडित, शिवराज धनाजी ननावरे, राम धर्मेंद्र गंधर्व, श्याम धर्मेंद्र गंधर्व, आयुष संभाजी चव्हाण, आदित्य महेश डिचमलवाड,आदेशकुमार रामाशंकर महतो, आरुष संतोष खोत, अनुष्का परमेश्वर तांदळे, अनुष्का मधुकर पंडित, चैतन्या विजय गायकवाड,रितीका पवन व्यास, दिपीका बिकाज कयाल, आराध्या जनार्दन पवार, अपेक्षा शांताराम बामगुडे, शिवराज रोहिदास पासलकर, ओम अंकुश दळवी हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापिका अनुराधा हनमघर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

“वर्षभर सुट्टी न घेता सकाळी आठ ते दहा व रात्री साडेसहा ते साडेनऊ या वेळेत नियमित तास घेतले.साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही प्रश्नपत्रिका सराव घेतला.रात्र अभ्यासिका हा उपक्रम राबवला.विद्यार्थी व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले. सातत्य,सराव,जिद्द व मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे.” सुनिल साखरे, मार्गदर्शक शिक्षक.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles